जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

बहुचर्चित वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम पोहचले गडचिरोली पर्यंत

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ मे)

बहुचर्चित व बहुप्रतीक्षित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग ५२ किलोमीटरचे काम गडचिरोली च्या जवळपास आले आहे.प्रथम रेल्वेमार्गाचे काम माती टाकून रूळ बनवण्याने सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होणार आहे. वडसा,कुरुड,आरमोरी,ठाणेगाव,पोरला,मोहझरी,काठली,गोगाव,अडपली,गडचिरोली असे रेल्वेमार्गाच्या रुळाचे काम सुरू आहे.

वडसा- गडचिरोली रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी सर्वप्रथम मातीचा भरणा केला जात आहे वडसा गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला दोन महिन्यापूर्वी देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथून सुरुवात झाली होती.

वडसा-आरमोरी ते गडचिरोली यादरम्यान वन्य जीवाची वर्दळ राहत असल्यामुळे या महामार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे त्यामुळे या प्रकल्पाची किंमत १०९६ कोटी वरून १८८८ कोटी रुपये झाली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के वाट्यातून रेल्वेचे काम उभारले जाणार आहे.

रेल्वे मार्गातील पुलाच्या बांधकामाकरिता डेपो ची उभारणी
¶¶¶
रेल्वे मार्गात येणाऱ्या पुलाच्या बांधकामा करिता अडपली-गोगाव जवळील सिंधुबाई पोरडीवार कनिष्ठ हायस्कूल तथा महाविद्यालयाच्या मागे अस्थायी स्वरूपाचा डेपो तयार करून कामाला गती देण्यात आलेली आहे.

रेल्वे महामार्गाचे काम बघण्याकरिता उसळली लोकांची गर्दी
¶¶¶
गडचिरोली शहरापासून ४ किलोमीटर दूर असलेल्या अडपल्ली गोगाव पर्यंत रेल्वे मार्गाचे काम आले असल्याने गडचिरोलीकर रेल्वे मार्गाचे काम कसे काय आहे हे बघण्याकरिता प्रचंड उत्सुकतेने जाऊन पाहत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button