बस दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी, नेरी-सिरपूर मार्गावरील घटना
प्रतिनिधी- प्रवीन वाघे(दि,२ नोव्हेंबर)
चिमूर तालुक्यातील नेरी-सिरपूर मार्गावर दुपारी 4 चे सुमारास बस आणि दुचाकी यांची समोरासमोर भिडत होऊन दुर्दैवी अपघात झाला, यात दुचाकी चालक सरळ बस च्या आतमध्ये घुसून गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरिता चिमूर येथे पाठविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की चिमूर आगाराची चिमूर तळोधी मार्गाची बस नेरीवरून सिरपूर ला जात असताना सिरपूर पहाडी च्या खाली अभिषेक प्रकाश सावसाकडे वय 20 वर्षं लोहारावरून शिरपूर मार्गे नेरी येथे आईला आणण्यासाठी दुचाकीने जात असताना दोन्ही वाहनात समोरासमोर जोरदार अपघात झाला यात अभिषेक गंभीर जखमी झाला सुदैवाने जीवित हानी टळली की बस पालटली नाही नेरी शिरपूर मार्गे तळोधी जाणारी बस क्र. MH07 C 9527 या बसच्या वाचकाने दुचाकीस्वार चालक अभिषेक ला जबर धडक दिली. यात अभिषेकला गंभीर व जबर मार लागला असून या घटनेची माहिती गावात कळताच घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली होती जखमीला बघून तात्काळ रुग्णवाहिका ला पाचारण करून त्याला प्राथमिक उपचारासाठी चिमूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहीती मीळताच नेरी पोलीस चौकीचे इंचार्ज धनोरे मेजर हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले.
