
गडचिरोली (दि,१० ऑक्टोंबर)
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५४ वा पुण्यतिथी सप्ताह अर्थात सर्वसंत स्मृती मानवता दिन सप्ताह बुधवार दिनांक १२ ऑक्टोबर ते मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२ या कालावधित अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, मुख्य शाखा गडचिरोली येथे पार पडणार आहे.
या दरम्यान दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दररोज सकाळी पहाटे ५.३० वाजता सामुदायिक ध्यान व चिंतन,सकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत शहरातील विविध वार्डातून रामधून, सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘विविध रचनात्मक कार्यक्रम, सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत सामुदायिक प्रार्थना व विचार प्रकटन, रात्री ७.३० ते ८ वाजेपर्यंत भजन, किर्तन, प्रवचन व सत्संग होईल.
सदर सप्ताहामध्ये दि.१२ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता दंडकारण्य शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते राष्ट्रसंतांच्या समाधीचे व प्रतिमेचे पुजन होईल. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता केशवराव दशमुखे यांच्याहस्ते ध्वजारोहन होईल. या दिवशी दुपारी ३.३० पालक मेळावा आयोजित केला आहे. दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता गुरुदेव उच्च प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. १४ ऑक्टोंबर दुपारी ४.५८ ला वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना मौन श्रध्दांजली वाहण्यात येईल.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता गुरुदेव कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.
याच दिवशी दुपारी १२ वाजता गोपालकाला फोडण्यात येईल. दुपारी २ वाजता शोभायात्रा व पालखी मिरणवुक तसेच रात्री ८ वाजता महाप्रसाद वितरण होईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाच्या आयोजकांनी केले आहे करण्यात आले आहे .
