जाहिरात
गडचिरोली

जिल्हयात २.९८ लक्ष घरांवर तिरंगा फडकणार, हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी मीणा यांचे आव्हान

पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

Spread the love

गडचिरोली, (दि,८ऑगष्ट) :

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रहावी यासाठी दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आवाहन केले आहे की, आपल्या घरांवर अभिमानाने तिरंगा उभारून हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करावा. गडचिरोली जिल्हयात ग्रामीण २.३८ लक्ष व नागरी ६० हजार असे मिळून २.९८ लक्ष घरांमधे तिरंगा उभारण्याचे उद्दीष्ट प्रशासनाकडून ठरविण्यात आले आहे. यासाठी आवश्यक ध्वज जिल्हयात प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आले आहेत. नागरिकांना ग्रामीण भागात ग्रामपंचायत, शाळा तर शहरी भागात नगरपंचायत कार्यालयात ध्वज उपलब्ध होणार आहेत.
खाजगी घरांबरोबरच ५४४१ शासकीय निमशासकीय इमारतींवर, खाजगी ५ हजार आस्थापनांमधे तिरंगा उभारण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सद्या शाळा, महाविद्यालये, क्षेत्रिय कार्यालये याद्वारे साजरा करण्यात येत आहे. नागरिकांना हर घर तिरंगा बाबतही माहिती विविध स्तरावर देण्यात येत आहे. प्रसिद्धी कार्यक्रमांमधे सर्व गावांमधे व शहरांमधे प्रभातफेऱ्या, बॅनर, पोस्टर, हॅण्डबील, ध्वनीक्षेपक सयंत्र, भित्तीचित्रे, पथनाट्य व प्रसार माध्यमांच्या वापरातून जनजागृती करण्यात येत आहे. अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी मीना यांनी दिली आहे .

नागरिकांनी संपूर्ण तीन दिवस ध्वज उभारावा
ध्वज संहितेचे पालन करून दि.१३ ऑगस्ट रोजी उभारलेला ध्वज दि.१५ ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत लावावा. घरासमोर ध्वज दर्शनी भागात उभारून त्याचा अवमान होणार नाही याची खात्री करून चांगल्या प्रकारे उभारावा. ध्वज हा आपल्या देशाचे प्रतिक असून त्याचा अभिमानपुर्वक सन्मान होईल याची दक्षता सर्व नागरिकांनी घ्यावी.

दि.९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. यात ०८ ते १० ऑगस्ट दरम्यान नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभांचे आयोजन, दि. ०९ ते १७ ऑगस्ट दरम्यान जिल्हयातील स्वातंत्र्यकालीन माहिती अथवा ऐतिहासिक ठिकाणची माहिती तयार करणे, शालेय/महाविद्यालय स्तरावरुन विविध स्पर्धा, निबंध,वक्तृत्व, चित्रकला स्पर्धाचे आयोजन, जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रांचे व ग्रंथाचे प्रदर्शन, जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, जिल्ह्यातील शासकीय इमारतीवर आजादी का अमृत महोत्सवी लोगो लावणे, दि.१० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, जिल्ह्याच्या मुख्यालयी ७५ फुट उंच राष्ट्रध्वज उभारणे, जिल्ह्यातीलअनाम वीर, हुतात्मा, शहीद यांची माहिती व सचित्र अनसंग हिरो बुकलेट बनविणे., जिल्ह्यातील वारसा स्थळांची स्वच्छता, कार्यालयांची स्वच्छता अभियान, दि. १२ ते १७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अनाम वीर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे यांचे दुर्मिळ फोटो व त्यांच्या कार्याची माहिती गावातील रस्त्यांच्या कडेला लावणे, संविधान स्तंभाची उभारणी, शासनमान्य लामणदिवा लावणे, दिनांक १३ ते १५ दरम्यान नागरिकांना हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक. दिनांक १४ ते १७ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढणे,विद्यापीठात विविध कार्यक्रमाचे आयोजन, दिनांक १५ ऑगस्ट रेाजी मुख्यालयाच्या ठिकाणी तिरंगी रंगाचे बलुन आकाशात सोडणे, प्रभात फेरीचे आयोजन, एन.सी.सी./ एन.एस.एस. कॅडेट चे संचालन, व सायक्लोथॉन, मॅरेथॉनचे आयोजन, दिनांक १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पुरातत्वदृष्टया महत्वाच्या वारसा स्थळे देखभाल करण्याकरीता ऐतिहासिक वारसा जपवणुक करणाऱ्या संस्थांना दत्तक योजना.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button