९ वर्षात अनेक विकास कामे पूर्णत्वास, आमदार डॉ.देवराव होळी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३ ऑक्टोंबर)
संपादक: संदिप कांबळे
भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासातून मी सन २०१४ मध्ये ५२ हजार मताधिक्याने व २०१९ ला ३६ हजार हुन अधिक मताधिक्याने सलग दोन विधानसभा निवडणुकीत मी निवडून आलो व आपल्या आशीर्वादाने मागील ९ वर्षात अनेक विकासाची कामे माझ्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मी केली अशी माहिती आमदार डॉ देवराव होळी यांनी आज शहरातील स्थानिक विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गडचिरोली जिल्हा निर्मितीपासून अनेक समस्या आपल्या विधानसभा क्षेत्रात होत्या त्या मी मागील शिंदे फडणवीस सरकारच्या काळात सोडवण्याचा प्रयत्न केला व यापुढेही प्रयत्न करत राहणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज चा प्रश्न असो की पाण्यासंदर्भात कोटगल बॅरेज चा प्रश्न असो की विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जिल्हा स्टेडियमचा प्रश्न असो येत्या पुढील काळात लवकरात लवकर सर्व प्रश्न मार्गी लागतील अशी सुद्धा भूमिका या प्रसंगी त्यांनी मांडली.
आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, रवी ओललवार, तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, विलास चलाख, विलास देशमुख, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे आदींची हजेरी होती.
