जाहिरात
क्राईम

तलवारीने केक कापणाऱ्या ४ तरुणांना आरमोरी पोलीसांनी केले जेरबंद,१ फरार

Spread the love

लोकशाही न्युज, आरमोरी (दि,२५ नोव्हेंबर) संपादक:संदिप कांबळे

रात्रीच्या वेळी नागरीकांच्या सुरक्षीततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते. गडचिरोली पोलीस दलाकडुन आरमोरी शहरातील रामाळा जाणा­ऱ्या मार्गावर काल दि. २५ नोव्हेंबर रोजी चे मध्यरात्री काही तरुण एकत्र येवुन आरडा ओरड करत असतांना दिसुन आल्याने त्याच्या जवळ जाऊन चौकशी केली असता गाडीच्या सीट वर केक ठेवुन केक अवैधरित्या तलवार बाळगुन केक कापत असतांना आढळून आले,तसेच गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन आणण्याच्या उद्देशाने तलवार सहित मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही मध्ये १) एक धार धार टोकदार तलवार अंदाचे दीड हजार रुपये किंमत, २) एक जुनी पांढ­या रंगाची अॅक्टीवा ६ जी MH-33 AA 1340 अंदाजे ५५ हजार रुपये किंमत, ३) एक जुनी वापरती काळया रंगाची सुपर स्प्लेडंर प्लस वाहन क्र MH- 33- Y-7854 अंदाजे ४० हजार रुपये किंमत मोटार सायकल असा एकुण अंदाजे ९६ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर गुन्हयातील आरोपी १) लोकेश विनोद बोटकावार वय २१ वर्ष, २) लोकमित्र खुशाल ठाकरे वय २५ वर्ष, ३) बादल राजेंद्र भोयर वय २३ वर्ष, ४) पवन मनोहर ठाकरे, वय २५ वर्षे व फरार आरोपी नामे राहुल मनोहर नागापुरे वय २८ वर्षे सर्व रा. बाजारटोली आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली वरील नमुद आरोपीतांच्या विरुध्द कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील फरार आरोपीचे शोध घेणे सुरु असुन गुन्ह्राचा पुढील तपास आरमोरी येथील पोलीस करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button