जाहिरात
ताज्या घडामोडी

पंचसुत्री कार्यक्रमाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात करणार : माजी आमदार डॉ. देवराव होळी

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखा गडचिरोली चा उपक्रम

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ३ ऑगस्ट)

जगातील आदिवासी बांधवांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी मानवी हक्काचे संरक्षण व संवर्धन व त्यावरील उपाय योजना यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २३ डिसेंबर १९९४ चा ठराव ४९/२१४ द्वारे ९ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केले ९ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो या दिवसाचे औचित्य साधून आदिवासी समाज बांधवाने समाज हित व सर्वांगीण विकासाकरिता पंचसूत्री स्वीकारावी व आदिवासी बांधवांनी आपला विकास साधावा असे आवाहन माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज (दि.३ ऑगस्ट) प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.

कुटुंब प्रबोधन- कुटुंब प्रबोधनातून शाश्वत आणि सक्षम कुटुंब व्यवस्था निर्माण करणे, पर्यावरण- व्यक्तीगत पातळीपासून ते सामाजिक पातळीपर्यंत पर्यावरण रक्षण आणि संवर्धन, सामाजिक समरसता- स्नेहमय सामाजिक संबंध जोपासणे, सामाजिक व व्यक्तीगत जीवनातील भेदभाव संपविणे, नागरी कर्तव्य- देशभक्तीसोबत सामाजिक व नैतिक मूल्यांचा अंगीकार करणे, स्व-जागृती- स्व-भाषा, स्व-संस्कृती, स्व-देश, स्वतःच्या परंपरा स्वीकारून त्याला विकसित करणे हीच पंचसुत्रे अंगिकारणे गरजेचे असल्याचे माजी आमदार डाॅ. देवराव होळी म्हणाले.

पत्रकार परिषदेला माजी आमदार डॉ. देवराव होळी, दिलीप चलाख,वामनराव जुनघरे, मुकुंदा मेश्राम, उमेश उईके, सुरज मडावी, कुणाल कोवे,पुष्पा कुमरे, विद्या दुगा, मालता कुडो हे उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button