गडचिरोली नगरपरिषद शाळेत असाही प्रकार.
टी सी दिली अर्धवट भरून, विद्यार्थ्याने पुढील प्रवेश घ्यायचा कसा ?

गडचिरोली (दि.१९जून) डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद उच्य प्राथमिक शाळा संकुल, गडचिरोली येथिल इयत्ता पहिलीत शिक्षण घेणारा विद्यार्थी शिवांश पालक नामें दिनेश कुमार वरखेडे यांना आपल्या पाल्याला दुसऱ्या शाळेत प्रवेशीत करायचे असल्यामूळे त्यांनी शाळा मुख्याध्यापकाशी संपर्क साधला असता शाळा मुख्याध्यापक मुलाची टी.सी.देण्यास टाळाटाळ करत आहेत.
संबंधित पालकाला त्याच्या मुलाची टी सी अर्धवट भरलेली देण्यात आली.
अर्धवट भरलेल्या टी.सी.वर दुसऱ्या शाळेत विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकत नाही हे माहीत असताना, जाणीवपूर्वक पालकाला मानसीक त्रास देण्याचे काम नगरपरिषद शाळेचे प्रभारी मूख्याध्यापक करत असल्याचे पालकाचे म्हणणे आहे.
शाळा लिपिकाची सही न घेता तालुक्याचे नाव न लिहिता पालकाला तिची देण्यात आली व इच्छा नसताना शाळा उठाव फंडाची रक्कम वसूल केल्यामुळे, नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केलेली आहे.
सौ,मंगला रामटेके
प्रभारी मुख्यद्यापीका
👇👇
उठाव फंडाची रक्कम ही जबरदस्तीने वसूल केल्या जात नाही ,ज्यांची इच्छा असते ते देतात ,आम्ही आजपर्यंत कुणाचीही टी सी अडवून ठेवलेली नाही .
