१० जुलै ला तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार
गडचिरोली (दि,२१ जून ) संताजी सोशल मंडळ गडचिरोली तर्फे वर्ग १० वी आणि १२ तील विज्ञान, कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा १० जुलैला रविवारी सत्कार करण्यात येणार आहे. १० वी मध्ये ८५ टक्के गुण तर १२ वीत ८० टक्के गुण प्राप्त तसेच आचार्य पदवी एमपीएससी, एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम
आयोजित करण्यात आला आहे. तरी तेली समाजातील गुणवंतांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ५ जुलैपर्यंत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुणवंतांनी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, अनिल बालपांडे, राजेश इटनकर, प्रमोद पिपरे, गोपीनाथ चांदेवार, संदीप बाळेकरमकर, सुधाकर लाकडे अड रामदास कुनघाडकर आदींकडे त्यांच्या दिलेल्या पाट्यावर गुणपत्रिका जमा करावी असे कळविण्यात आले आहे .
दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सन्मानचिन्ह देऊन केला जातो. मात्र मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे सत्काराच्या या कार्यक्रमाला ब्रेक लागला. आता कोरोना संकट टळल्याने सदर कार्यक्रम होत आहे.
