जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

वडसा – गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम सुरू

खासदार अशोक नेते यांनी केली कामाची पाहणी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि.२४ जानेवारी)

बहुप्रतिक्षित वडसा ते गडचिरोली या ५२ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या कामाला बुधवारी खासदार अशोक नेते यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वेच्या अभियंत्यांनी त्यांना झालेल्या कामाची माहिती दिली.

वडसा ते आरमोरी यादरम्यान वन्यजीवांची वर्दळ राहत असल्यामुळे या मार्गावर रेल्वेसाठी पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत १०९६ कोटी वरून १८८८ कोटी रुपये झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येकी ५० टक्के वाट्यातून उभारल्या जात असलेल्या या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यात ३२२ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारल्या जाणाऱ्या २० किमीच्या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात झाली. वडसा रेल्वे स्थानकापासून गडचिरोलीच्या दिशेने या कामाची सुरुवात करण्यात आली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button