जाहिरात
ब्रेकिंग न्युज

वैनगंगा नदी पात्रात नाव उलटून ६ जणांना जलसमाधी, २ जण बचावले

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,२३ जानेवारी)
चामोर्शी तालुक्यापासून २६ किलोमीटर दूर असलेल्या गणपुर रै या गावाजवळ असलेल्या वैनगंगा नदीपात्रात नाव पाण्यात बुडून सहा महिलांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना २३ जानेवारी मंगळवार रोजी ११ वाजताच्या सुमारास घडली.

मृतकात १)जिजाबाई दादाजी राऊत २)पुष्पा मुक्तेश्वर झाडे ३)रेवता हरिचंद्र झाडे ४)मायाबाई अशोक राऊत ५)सुषमा सचिन राऊत ६)बुधाजी देवाजी राऊत सर्व गणपुर रै येथील मृतक महिला आहेत सारूबाई सुरेश कस्तुरे या महिलेला वाचविण्यात एनडीआरएफ च्या टीमला यश आले आहे. नाव चालविणारा नावाडी हा पोहून पाण्याबाहेर आला असून सुखरूप जिवंत आहे.

गणपुर रे निवासी मृतक महिला ह्या मिरची तोडण्याच्या मजुरी करिता चंद्रपूर जिल्ह्यात नावेच्या साहायाने जात होत्या अचानक नाव पाण्यात उलटून गेल्याने त्या महिलांना प्राणास मुकावे लागले.

चामोर्शी पोलीस घटनास्थळावर शोध मोहीम राबवली असून त्यांच्या मदतीला गडचिरोली, अहेरी व चंद्रपूर येथील एनडीआरएफ च्या टीम शोध मोहीम राबवली सर्व मृतकाना बाहेर काढण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button