जाहिरात
आपला जिल्हा

प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील घटना

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ डिसेंम्बर) 

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा येथे उजेडात आली आहे. साधना संजय जराते (२३ रा.कारवाफा) असे मृत महिलेचे नाव असून कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या कुटुंबाने दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

८ डिसेंबरला कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबीर घेण्यात आले होते. यात मृतक साधना जराते यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु १० डिसेंबरला मध्यरात्री साधनाची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्चात दोन लहान चार वर्षीय, व एक वर्षाचा दुसरा मुलगा पोरकी झाली आहे. कुटुंबाने आरोग्य विभागावर शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला असून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button