जाहिरात
राजकीय

आमदार भाई जयंत पाटील,मोहफुलांपासून इथेनॉल निर्मिती करा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१२ डिसेंम्बर)

१९९३ सालापासून दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलापासून दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे उद्घाटन झाले. यावरून आज औचित्याचा मुद्दा सभागृहासमोर चर्चिला जात असताना आमदार भाई जयंत पाटील यांनी मोहफुलापासून इथेनॉलची निर्मिती होत असेल तर शासनाने याचा विचार करावा, तसेच मोहफुलाचा व्यापार बाहेरील जिल्ह्यात करून तेथील आदिवासी बांधवाना आर्थिक उत्पन्न मिळवून द्यावे व तेथील नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून रोजगाराची स्थानिकांना संधी द्यावी, अशी मागणी सभागृहात केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भाई जयंत पाटील यांच्या मागणीचे समर्थन करत यादृष्टीने शासन प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त सबसिडीसह मोहफुलांवरील इथेनॉल निर्मिती उद्योगांना गडचिरोली जिल्ह्यात चालना देण्यात येईल असे आश्वासन दिले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button