जाहिरात
गडचिरोली

गडचिरोली-आरमोरी रस्त्याची झाली दुर्दशा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३० जुलै)

जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे गडचिरोली आरमोरी रस्त्याची दुर्दशा झालेली आहे,तसेच पुराचे पाणी महामार्गावर आल्याने रोड अतिशय खराब झाला त्यामुळे वाहन चालवताना जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वाहन चालवताना अडथडे निर्माण होत आहेत.आरमोरी रोडवरील मोठमोठे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत त्यामुळे येत्या काळात त्या रोडवर मोठमोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गडचिरोली मुख्यालयातील इंदिरा गांधी चौक पासून तर बाबा फरीद दर्ग्यापर्यंत मोटमोठे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यापुडे गेल्यास साखरा जवळ रस्ता खूप मोट्या प्रमाणात खराब झाला आहे. पोरला ते चुरमुरा तर संपुर्ण रोड हा खड्डेमय झाला आहे.आरमोरी रस्त्यातील डोंगरगाव, देऊळगाव व महामार्गावरील अनेक गावपुढे खड्डेच खड्डे पडले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने खराब झालेल्या रस्त्याची दखल घेऊन रस्ता तात्पुरता डागडुजी करावा अशी मागणी गडचिरोली वासीयांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button