विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते सोनापूर येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत

लोकशाही न्यूज (दि,१८ नोव्हेंबर)
सुदर्शन गोवर्धन
व्याहाड बुज सर्कल
सावली — विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा.सोनापूर येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण मायाबाई लालाजी भुरसे वय 40 वर्ष यांना सोनापूर ग्राम काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष डोमाजी शेंडे युवा नेते अविनाश दिवाकर भुरसे, सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष दिनकर वाघाडे ,मा.उपसरपंच पांडुरंग बांबोळे,तंटामुक्ती अध्यक्ष कवेश्वर भांडेकर यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की मायाबाई लालाजी भुरसे ह्या मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे उपचार घेत होत्या. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले,घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्याने पुढील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने व सावली तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष किशोर कारडे यांना मिळाली.त्यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना संपर्क करून मायाबाई लालाजी भुरसे यांना आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डोमाजी शेंडे युवा नेते अविनाश दिवाकर भुरसे ,सोनापूर येथील मा.उपसरपंच व जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता पांडुरंग बांबोळे ,सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष दिनकर वाघाडे, तंटामुक्ती अध्यक्ष कवेश्वर भांडेकर, अध्यक्ष नंदकिशोर बांबोळे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्रीधर सोनुले, देवराव भांडेकर, एकनाथ भुरसे,मनोज कोसरे, पंकज रणदिवे ,सोनापूर येथील काँग्रेस तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
