मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नंदिनी इंडस्ट्रीजच्या रिताली मस्के यांना ५० लक्षचा धनादेश वितरित

लोकशाही न्युज, गडचिरोली (१० जुलै)
गडचिरोली येथे झालेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमातील झालेल्या भव्य कार्यक्रममात सदर चेकचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली एमआयडीसी मध्ये सिमेंट विटा निर्मितीचा उद्योग सुरू करण्यासाठी नंदिनी इंडस्ट्रीजच्या रिताली दिलीप मस्के यांना ५० लक्ष रुपयाचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार , कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते व माजी मंत्री शोभा फडणवीस, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी , आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीना , जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला.
आमदार डॉ देवराव होळी यांच्या मेक इन गडचिरोली अंतर्गत सदर उद्योगाला चालना मिळाली असून त्यांच्या यशस्वी प्रयत्नांतून या उद्योगाची सुरुवात झाली असल्याची प्रतिक्रिया नंदिनी इंडस्ट्रीच्या संचालिका रिताली दिलीप मस्के यांनी यावेळी दिली.
सदर शासकीय योजनेचा लाभ मिळवुन दिल्याबद्दल जिल्हाधीकारी, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र , तसेच राज्य सरकारचे यावेळी त्यांनी मानले आभार.
