गडचिरोली : पवन गेडाम यांची शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पदी निवड

लोकशाही न्युज,गडचिरोली , (दि. १२ जून ) –
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
डॉ. श्रीकांत बनसोड यांची सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून गडचिरोली जिल्हा हे त्यांचे कार्यक्षेत्र असेल. पवन गेडाम आणि दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून गेडाम यांचे कार्यक्षेत्र गडचिरोली व आरमोरी विधानसभा तर सुरपाम यांचे कार्यक्षेत्र अहेरी विधानसभा असेल. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
पवन गेडाम हे शिवसेनेत मागील काही वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी नगर परिषद निवडणुन सुद्धा लढवली होती. पण त्यांना त्या निवडणुकीत यश मिळाले नाही.
पवन गेडाम यांच्या जिल्हाप्रमुख पदी निवडीमुळे गडचिरोली शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
