२० नोव्हेंबर ला निःशुल्क मूळव्याध तपासणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१८ नोव्हेंबर)
संपादक:संदिप कांबळे
जागतिक मुळव्याध दिनाचे औचित्य साधून सोमवार २० नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील वेदा पाइल्स हॉस्पिटलमध्ये निःशुल्क मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मूळव्याध, पाईल्स/हेमोरहॉईड्स, फिशर, भगंदर(फिस्टूला) ही एक अतिशय सामान्य समस्या आहे, जवळपास ५०-६० टक्के लोक या व्याधीनें त्रस्त आहे. संकोच आणि शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे मूळव्याधच्या उपचारासाठी लोक पुढे येत नाहीत. या दिवशी आम्ही प्रत्येकाला आवाहन करू इच्छितो की ज्यांना या लक्षणांचा त्रास आहे त्यांनी पुढे येऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी,
कारण तपासणीस उशीर झाल्यास रोगाचे उपद्रव वाढतात, विशेषतः कर्करोगाच्या बाबतीत रोगनिदान बिघडू शकते.लवकर निदान केल्यास रोग लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे लवकर तपासणी ही जीवनरक्षक आहे.योग्य निदानाशिवाय औषध घेऊ नका. भीती आणि संकोच समस्या प्रगत टप्प्यात वाढवू शकतात. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे मुळव्याध तज्ञ सौरभ नागुलवार यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 8554041305
शिबिर स्थळ व मार्गदर्शन पत्ता – वेदा पाइल्स हॉस्पिटल, इंदिरा गांधी चौक, बी. एस. एन. एल. ऑफिस समोर , गुजरी रोड, गडचिरोली.
