जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

हेमंत डोर्लीकर व संदिप कांबळे “गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन” (गामा ) च्या संयोजकपदी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ जानेवारी)

स्थानिक इंदिरा गांधी चौकातील दिनांक ६ जानेवारी रोजी रेस्ट हाऊस येथे झालेल्या बैठकीत “गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन” (गामा) च्या संयोजकपदी हेमंत डोर्लीकर व संदिप कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बदलत्या काळानुसार देशभरात “डिजिटल इंडिया” या संकल्पनेनुसार अनेक कामे डिजिटल झाली आहेत. त्याच बरोबर दैनंदिन घडामोडी, बातम्या याबाबत डिजिटल मीडियाचा व्यापही मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही डिजिटल मीडियाचा व्याप मोठ्या प्रमाणात असून डिजिटल मीडिया विषयी नवनवीन धोरण, कार्यप्रणाली, डिजिटल मीडियाशी निगडित पत्रकारांच्या विविध समस्या व मागण्या शासन दरबारी मांडता याव्यात याकरिता गडचिरोली येथे ‘गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन’ या संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

आताच्या घडीला झटपट बातमी पोहचविण्याचे माध्यम म्हणून डिजिटल मीडिया कडे बघितले जाते. कोणतीही घटना अथवा बातमी, घडामोडी झटपट ऑनलाईन प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मीडियातील पत्रकार तत्परतेने करित आहे. वाचक वर्गाचा सुद्धा ऑनलाईन न्यूज ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत असून वाचकांचा कलही वाढतांना दिसत आहे.
गडचिरोली ऑल डिजिटल मीडिया असोसिएशन ही मागील दोन वर्षांपासून गडचिरोली शहरामध्ये कार्यरत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल जयंत निमगडे (गडचिरोली वार्ता न्युज),अनिल बोदलकर (एविबी न्युज),उदय धकाते (महाभारत न्युज),किशोर खेवले (लोकप्रवाह न्युज),वेकटेश दुडमवार (गोंडवाना टाइम्स न्युज),(विदर्भ क्रांती न्युज), जगदीश कन्नाके(महाराष्ट्र टुडे न्युज) सचिन जीवतोडे (द गडविश्व), संतोष सुरपाम (संतोष भारत न्युज),मनीष कासरलावार (विदर्भ न्युज एक्सप्रेस), प्रवीण चनावार (वृत्तवाणी), यांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकार परिषदांसाठी संपर्क
¶¶¶
१,हेमंत डोर्लीकर (पूर्णसत्य न्युज पोर्टल)
मो.८८३०३४७०८७ ,९४०३९१४९८५

२,संदिप कांबळे (लोकशाही न्युज पोर्टल)
९४२१३१८०२१,९९७५०५६९५५

यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन “गामा” च्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button