जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

शेकापच्या प्रियंका कुमरे देलनवाडीच्या सरपंचपदी

Spread the love

लोकशाही न्युज,आरमोरी(दि,३० डिसेंम्बर)

आरमोरी तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायतची शुक्रवारला सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या प्रियंका रोहिदास कुमरे यांनी ७ विरुद्ध २ अशी आघाडी घेवून सरपंच पदाची निवडणूक जिंकली.

देलनवाडी, नागरवाही, कोसरी या तीन गावांची गट ग्रामपंचायत असलेल्या ९ सदस्यीय देलनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त होते. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रियंका रोहिदास कुमरे यांना ग्रामपंचायत सदस्य इना मेश्राम, मुनिचंद मडावी, शुभांगी मसराम, राजेंद्र पोटावी, त्रिलोक गावतुरे, अश्विनी गरमळे या सात सदस्यांनी हात उंचावून मतदान केले.

प्रियंका कुमरे या देलनवाडीच्या सरपंच झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, जिल्हा सहचिटणीस रोहिदास कुमरे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, अशोक किरंगे, डॉ. गुरुदास सेमस्कर, क्रीष्णा नैताम, तुळशीदास भैसारे, पांडुरंग गव्हारे, बाजीराव आत्राम, गंगाधर बोमनवार, दामोदर रोहनकर, देवेंद्र भोयर, सुरज ठाकरे, चंद्रकांत भोयर, तितिक्षा डोईजड, ॲड. नर्गिस पठाण, निशा आयतूलवार, कविता ठाकरे, सुनिता पदा, रेश्मा रामटेके, विजया मेश्राम आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button