जाहिरात
चंद्रपूरसिंदेवाही

आसामी हत्तीचा सिंदेवाही तालुक्यात मृत्यू,वनविभागात खळबळ

Spread the love

लोकशाही न्युज, सिंदेवाही (दि,३ ऑक्टोंबर) संपादक:संदिप कांबळे

मागील काही दिवसांपासून सिंदेवाही तालुक्यात हत्तीने धुमाकूळ घातला असताना मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी एक हत्ती मृतावस्थेत मिळाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

हत्तीने या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन हत्तीचा मृत्यू तर झाला नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.आसाम येथील हत्ती छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले.येथून हे हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सावली,सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यात धुमाकूळ घालत आहे.

मंगळवार ३ आक्टोंबर रोजी सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका खाजगी शेतात मृता अवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता,वनविभाग त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता.मात्र एक हत्ती मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.दरम्यान शेतकरी शेतात कुंपणाला जिवंत वीज प्रवाह सोडतात.या वीज प्रवाहाचा स्पर्श होऊन तर हत्ती दगावला नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button