जाहिरात
भ्रष्टाचार

नियमबाह्य काम करणारे वनरक्षक दुर्गे यांचेवर  कारवाई करा,योगाजी कुडवे यांची निवेदनातून मागणी

५ ऑक्टोंबर पासून करणार आंदोलन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३ ऑक्टोंबर) संपादक:संदिप कांबळे

गडचिरोली मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील आंबेशिवणी येथे वनरक्षक दुर्गे यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करतांना ग्राम पंचायतला थांगपत्ता न लागू देता कागदोपत्री समिती स्थापन करून बँकेत खाता तयार करून खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही ग्रामपंचायतची उपसमिती असते, समिति स्थापन करतांना ग्रामसभेची परवानागी असणे बंधनकारक आहे. परंतु  दुर्गे वनरक्षक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत स्वताच्या मनमार्जिणे कागदोपत्री संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना केलेली आहे,यास वनरक्षक जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करावी.

सदर तक्रारी च्या अनुषंगाने कारवाई न केल्यास आपण दि,५ ऑक्टोंबर पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय समोर आंदोलन करणार अशी तक्रार योगाजी कुडवे यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयास दिली आहे.आंबेशिवणी येथे याबाबत दि,२७/६/२०२३ रोजी मासिक सभेत चर्चा करून शासकीय नियमविरुद्ध व ग्रामपंचायत व ग्रामसभेची अवहेलना करणाऱ्या वनरक्षक वनरक्षक दुर्गे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत ठराव पारित करण्यात आले असून,त्यानुसार तात्काळ कार्यवाही करावी.

तसेच दि,१२/८/२०२३ रोजी याबाबत चौकशी समितीने चौकशी केली,तसा अहवाल सादर केलेला आहे,चौकशी समिती समक्ष जो रेकॉर्ड सादर करण्यात आला,तो रेकॉर्ड नव्याने तयार करून चौकशी समितीची दिशाभूल करण्यात आली,तसेच चेकवर सह्या करण्यात आल्या असून सदर रक्कम हडप करण्याचा हेतु वनरक्षक दुर्गे यांचा दिसून येतो,असे असतांना कारवाहीस विलंब झाल्याने दि ७/९/२०२३ पासून मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मला वनविभाग गडचिरोली या कार्यालयात बोलवून ७ दिवसात कारवाई करण्यात येईल आपण आंदोलन करू नये असे सांगण्यात आले, परंतु यास खूप कालावधी लोटून सुद्धा कारवाई न करता वनरक्षक दुर्गे यांना पाठीशी घेण्याचे काम सुरू आहे हे लोकशाही करिता घातक आहे, त्यामुळे लोकशाही मार्गाने दि,५ /१० /२०२३ पासून मुख्य वन संरक्षक वनवृत्त कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती आज दिलेल्या निवेदनात योगाजी कुडवे,सचिन भुसारी,आकाश मट्टाम्मी, यांनी केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button