जाहिरात
आरोग्यव्हाहाड

१२५ लाभार्थ्यांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

Spread the love

सुदर्शन गोवर्धन
व्याहाडा बूज सर्कल प्रतिनिधी
लोकशाही न्यूज नेटवर्क (दि,२७ सप्टेंबर)

येथून जवळच असलेल्या सोनापूर येथे युवा सावर्जनिक गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी १२ ते ४ वाजेपर्यंत या वेळेमध्ये करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील १२५ लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता. तर या आरोग्य सेवेमध्ये सर्दी, ताप, खोकला, बी.पी, शुगर, या सह इतरही आजाराबद्दल सेवा देण्यात आली आहे.या आरोग्य शिबिरात कु. पल्लवी हजारे समुदाय आरोग्य अधिकारी प्रा.आ.केंद्र व्याहाड बूज यांनी आपली मोफत सेवा दिली. तसेच श्री. भोंडे  आरोग्य सेवक, कु . वैजयंतीमाला शंभरकर ,आरोग्य सेविका स्नेहा गोवर्धन मॅडम आरोग्य सेविका, सौ . नंदा मेश्राम आशा वर्कर, सौ.ज्योती सू.गोवर्धन आशा वर्कर , यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिराचे आयोजन युवा सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष दिनकर वाघाळे , उपाध्यक्ष्य मनोज कोसरे, सचिव पंकज रणदिवे ,श्रीधर सोनुले शा.व्य.स.अध्यक्ष, यशवंत रणदिवे मा.पोलिस पाटील,नंदकिशोर बांबोळे माजी अध्यक्ष .त.मू.गा.स. कार्यकर्ते टीकाराम सातारे,आकाश कोसरे, दिनकर मेश्राम, प्रफुल राऊत, शुभम भंडारे, कैलाश वाघाळे, रोशन गुरणुले, राकेश मेश्राम, नीलेंद्र कोसरे , प्रमोद सातारे, दिवाकर राऊत, आकाश वाघाळे, सचिन बावणे, ऋषी सातारे, अमोल कोसरे, राहुल रणादिवे,सुभाष वाघाळे, राहुल भंडारे व गावातील इत्तर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे आरोग्य शिबीर उत्साहामध्ये संपन्न झाले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button