जाहिरात
आपला जिल्हाविशेष

निखिल धार्मिक प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी, बच्चू कडू यांच्या हस्ते नियुक्तीपत्र बहाल

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,२८ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे

आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव या गावी राहणारे निखिल धार्मिक यांची प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असल्याने त्यांच्या निवडीबद्दल आनंद साजरा केला जात आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष व मार्गदर्शक व आमदार बच्चु कडू यांच्या हस्ते निखिल धार्मिक यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक यांच्याकडे गडचिरोली, धानोरा, आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची या  सहा तालुक्याची जबाबदारी दिली गेली आहे.

निखिल धार्मिक हे प्रहार जनशक्ती पक्षात मागील बऱ्याच वर्षापासून सक्रिय कार्यकर्ते आहेत शेतकरी,शेतमजूरअपंग,विधवा,व सर्वसामान्य जनता यांचे विविध प्रश्न घेऊन ते नेहमी प्रशासनाशी लढत असतात.त्यांच्या कार्याची दखल यावेळी बच्चु कडू यांनी घेतली आहे.

बच्चू कडू दिव्यांगा च्या दारी अभियान ला गडचिरोली दौऱ्यावर आले असतांना परतीच्या प्रवासात डोंगरगाव येथे निखिल धार्मिक यांच्या राहते घरी सदिच्छा भेट दिली व त्यांना नियुक्तीपत्र बहाल गेले.

दि,१८ मे २०२३ ला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले असताना निखिल धार्मिक यांना जिल्हाध्यक्षपदाची निवडी बाबत संकेत दिले होते अशी बातमी लोकशाही न्यूज पोर्टलने प्रकाशित केली होती ती आज बातमी १०० टक्के खरी ठरलेले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button