जिमलगट्टा पोलीसांनी केली २५ लाख रुपयांची दारू जप्त

लोकशाही न्युज, अहेरी/सिरोंचा(दि,१६ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दहा चाकी वाहनातून मौजा आलापल्ली ते सिरोंचा रोडने अवैधरित्या देशी दारु वाहतूक होणार आहे.त्या माहिती च्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर उप पोस्टे जिमलगट्टा प्र.अधिकारी संगमेश्र्वर बिरादार व पोलीस यंत्रणा यांनी सापळा रचुन अशोक लेलँड कंपनीच्या मोठ्या जड वाहनातून ट्रकभर दारू सापडली.
आरोपी कैलास मडावी रा. लखनगुड्डा यास पकडुन त्याच्या ताब्यातुन १) अशोक लेलँड कंपनीची दहा चाकी माल वाहतुक वाहन क्र. एम. एच. ४० सी. डी. ३५३० किंमत अंदाजे १५ लाख रुपये
२) रॉकेट कंपनीची संत्रा देशी दारुचे २७० बॉक्स किंमत अंदाजे १० लाख रुपये असा एकुण २५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीविरुद्ध उप पोस्टे जिमलगट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
निलोत्पल,
पोलीस अधीक्षक गडचिरोली ¶¶¶¶
गडचिरोली जिल्ह्रातील नागरीकांना आवाहन केले की, जिल्ह्रात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
