श्री ज्ञानेश्वर विद्यालय पेठ येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
लोकशाही न्युज,चिखली प्रतिनिधी, मेघा जाधव (दि,२ ऑगस्ट)
लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आर. डी. गायकवाड तर प्रमुख वक्ते श्री एम एस वाघ सर हे होते तसेच त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हिवरकर सर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या खडतर जीवन प्रवासाबाबत व त्यांनी कशाप्रकारे समाज कार्य केले संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे लौकिक कार्य त्यांनी केले त्यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोमल जाधव भाषण तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या वर आधारित गीते सादर केली. या कार्यक्रम प्रसंगी विशेष योगदान श्रीजी टी शेळके सर यांचे होते तसेच शाळेतील सर्व कर्मचारी यावेळी हजर होते. यामध्ये श्री भागवत शेळके सर, श्री जाधव सर, देशमुख सर, समाधान जाधव सर, झाल्टे सर,बंगाळे सर,करडेल सर, भाकडे सर, डी.बी शेळके सर वाघ सर पर्यवेक सर आडव सर व शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
