गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने मनोज जाधव यांचे आंदोलन स्थगित
लोकशाही न्युज,चिखली प्रतिनिधी, मेघा जाधव (दि २ ऑगस्ट)
पेठ गावातील घरकुल रखडलेले असता गरजु लोकांना व पात्र असलेले नागरीकांना घरकुल मिळण्या करिता कॉंग्रेस पार्टी चे चिखली तालुका उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पुत्र मनोज यांनी , पेठ येथील मोबाइल टॅवर वर चढून आंदोलन केले, स्वतःचा जीव धोक्यात टाकुन मनोज जाधव यांनी हे आंदोलन सर्वांसाठी केले.
या आंदोलनात पेठ गावचे सरपंच विष्णुपंत शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील संजय शिंपने, व गावकर्यांनी मनोज जाधव यांना सहकार्य केले, तसेच कॉंग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष व मा. आमदार राहुलभाऊ बोद्रे प्रशासनाला सांगीतले कि माझ्या कार्या करीता जिवाची बाजी लाऊन जनते करीता हे आंदोलन करत आहे, जर माझ्या कार्यकर्त्याला आंदोलन दरम्यान काही ईजा झाली तर प्रचंड प्रलय आल्या शिवाय राहणार नाही, त्या करीता मनोज जाधव यांची मागणी पुर्ण करावी, असे राहूलभाऊ बोंद्रे यांनी पत्रकाराशी बोलतांना सांगीतले, या वेळेस स्वाभीमानी शेतकरी संघटने चे युवा नेते संतोष शेळके.विठ्ठल शेळके यांनी पाठींबा दीला, तसेस शिवसेना उ.बा.ठा. चे तालुका प्रमुख गजानन पवार , तथागत गृप चे विदर्भ अध्यक्ष रवि मगर यांनी पाठींबा दिला, तसेच पुर्ण गावकर्यांचे सहभाग होते.
