सम्राट पृथ्वीराज चव्हाण चित्रपट कर मुक्त करा आ. सौ श्वेता ताई महाले यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकशाही न्युज पोर्टल..
चिखली | मेघा जाधव
मो.9529186383..
चिखली : हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झालेल्या आणि परकीय मुस्लिम आक्रमक मोहंमद गझनवी याला तब्बल १७ लढायात पराभूत करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनावर आधारित सम्राट पृथ्वीराज चव्हाण हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट कर मुक्त करण्याची मागणी आ सौ श्वेताताई महाले यांनी एका लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री ना उध्दवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे .
दि ३/ ६/२०२२ रोजी सम्राट पृथ्वीराज चव्हाण हा चित्रपट प्रदर्शित झाला असून याच दिवशी आ सौ श्वेता ताई महाले यांनी हा चित्रपट कर मुक्त करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराज पृथ्वीराज चौहान हे भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय नाव आहे. आपल्या मुसद्दी आणि कर्तबगारीने त्यांनी त्यांचे साम्राज्य वाढविले होते . चौहान घराण्यात जन्मलेले पृथ्वीराज हे शेवटचे हिंदू शासक होते. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या निधनानंतर दिल्ली आणि अजमेरची सत्ता हाती घेतली आणि ती अनेक मर्यादेपर्यंत पसरवली होती, पण शेवटी ते राजकारणाचे बळी ठरले आणि त्यांचे संस्थान गमावले, परंतु त्यांच्या पराभवानंतर हिंदू राज्यकर्ते त्यांची कमतरता पूर्ण करू शकले नाहीत. पृथ्वीराजांना राय पिथोरा म्हणूनही ओळखले जात असे. पृथ्वीराज चौहान हे लहानपणापासूनच कुशल योद्धा होते, त्यांनी युद्धाचे अनेक गुण शिकले होते. शब्दभेदी बाण विद्या त्यांनी लहानपणापासूनच पाळली होती.
महाराज पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहंमद घोरी व इतर मुस्लिम जुलमी शासक यांच्या सोबत लढून आपले साम्राज्य वाढविले . अशा या महान राजा च्या जीवनावर आधारीत ” सम्राट पृथ्वीराज ” हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत असल्याने सदर चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे…
