जाहिरात
आपला जिल्हा

५ मे ला “शेकाप” साजरी करणार कार्ल मार्क्स यांची जयंती

कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे भाई रामदास जराते यांचे आवाहन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ३ मे)

जगातील दारिद्र आणि शोषणाच्या व्यवस्थेचा पर्दाफाश करून, समतेसाठी गरीब,कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांना भांडवलशाही विरोधात स्वाभीमानाने लढण्याचा संदेश देणारे महान तत्त्ववेत्ता,वैचारीक क्रांतिकारक काॅ. कार्ल मार्क्स यांचा जन्मोत्सव शेतकरी कामगार पक्षातर्फे संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याअनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात काॅम्रेड कार्ल मार्क्स यांचा २०७ वा जन्मोत्सव सोमवार दिनांक ५ मे २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त ‘मार्क्स कोण होता?’ याविषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व बिर्याणीचे भोजनदान करण्यात येणार आहे. तरी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा, तालुका व गाव समिती पदाधिकारी,सदस्य आणि पक्ष कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालय, मच्छी मार्केटच्यावर, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे ‘मार्क्सबाबांच्या’ जयंती करीता आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button