जाहिरात
आपला जिल्हा

लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड च्या वतीने सुरजागड व कोनसरी येथे ध्यानयोग शिबिर

३ हजार हून अधिक लोकांनी घेतला लाभ

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ एप्रिल)

आजच्या धावपळीच्या युगात तणाव व मानसिक थकवा सामान्य झाले आहेत. अशा काळात लॉइड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) यांनी एक अद्वितीय पुढाकार घेत स्थानिक रहिवाशांना व कर्मचाऱ्यांना अंतर्मनाशी जोडण्यासाठी हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिर सुरजागड व कोनसरी येथे आयोजित केले.

या शिबिराचे मार्गदर्शन स्वयंसाक्षात्कारी योगी परम पूज्य सद्‌गुरू श्री शिवकृपानंद स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत झाले. शिबिरात ३ हजार हून अधिक स्थानिक ग्रामस्थ, ग्रामप्रतिनिधी, पोलीस अधिकारी व कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

हे शिबिर केवळ ध्यानसत्र नव्हते, तर मानसिक स्वास्थ्य व अध्यात्मिक जागृतीकडे नेणारा एक व्यापक आंदोलन होते. स्वामीजींनी आपल्या हिमालयातील १६ वर्षांच्या तपश्चर्येचा व विभिन्न साधकांकडून घेतलेल्या शिक्षणाचा अनुभव सांगताना ध्याना चे महत्त्व व जीवनातील अंतर्गत परिवर्तनाबाबत मौलिक मार्गदर्शन केले.

एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण व वरिष्ठ अधिकारी मंडळींनी देखील या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला बी. प्रभाकरण यांनी स्वामीजींना सन्मानित करत आपल्या भाषणात आभार व्यक्त केले. ते म्हणाले,” स्वामीजींनी आमच्या कर्मचाऱ्यांना व स्थानिक नागरिकांना अंतर्मनाशी जोडण्याचा मार्ग दाखवला, यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत. दररोज काही मिनिटे ध्यान केल्याने वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो.

स्वामीजींनी देखील एलएमईएल व श्री प्रभाकरण यांच्या कर्मचाऱ्यांच्या व समुदायाच्या कल्याणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. समर्पण ध्यानयोग ही प्राचीन ध्यानपद्धती आज ७२ हून अधिक देशांमध्ये प्रचलित असून, एलएमईएलने या पद्धतीचा प्रचार व प्रसार स्थानिक पातळीवर प्रभावीपणे केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

एलएमईएलच्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे केवळ पायाभूत सुविधा व उपजीविकेपुरते मर्यादित न राहता, त्यांनी लोकांच्या अंतर्मनाच्या समृद्धीसाठी पाऊल उचलले आहे. या शिबिरामुळे प्राचीन हिमालयीन तत्त्वज्ञान व आधुनिक जीवनशैली यांच्यातील दरी कमी झाली असून, सर्व सहभागींसाठी एका नव्या शांततेच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button