जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : पहेलगाम हत्याकांडातील मृतांना कारगील चौकात श्रद्धांजली

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि.२५ एप्रिल)

जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दुर्देवी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २८ जणांना कारगील चौक स्मारक येथे २४ एप्रिल ला संध्याकाळी ७ वाजता भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. व घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. “शांततेसाठी जमूया” या टॅगलाईनसह एक भावनिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पहेलगाम हत्याकांडातील मृताना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक गडचिरोली वासिय नागरिकांनी एकत्र येऊन कारगिल चौकात मेणबत्ती लावून व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.या कार्यक्रमात शहरातील विविध संघटनांचे सदस्य, युवकवर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रत्येकाच्या हातात मेणबत्त्या, डोळ्यांत अश्रू आणि अंतःकरणात देशप्रेम जागं होतं.

कार्यक्रमात शहीद पर्यटकांच्या स्मृतीसाठी मौन पाळण्यात आलं आणि उपस्थितांनी देशात शांतता, एकता आणि सदभावना नांदावी यासाठी संकल्प घेतला. “शांततेसाठी जमूया, एकतेचा उजेड पसरवूया” या घोषवाक्यानं संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळाचे उदय धकाते यांचे विशेष योगदान राहिले. श्रद्धांजली साठी गडचिरोली -चिमूर लोकसभा चे खासदार डॉ. नामदेव किरसान हे प्रामुख्याने हजर होते. मंडळाचे सुनील देशमुख, डॉ. बिडकर,संदिप कांबळे, राजू पुंडलिककर, मोतीराम हजारे, संजय गद्देवार,महेंद्र मसराम,रुपेश सलामे,प्रकाश धकाते, सुचिता धकाते, निलिमा देशमुख,वनिता भांडेकर,चन्नावार,राजू सालवे, श्रीकांत पतरंगे,चंद्रशेखर भडांगे, सुशील हिंगे, गीता हिंगे, विजय सालवे, प्रा. सालवे,विश्जीत कोवासे,गीता मोहरकर, विजय सुरपाम, राज डोंगरे, अंकित कुळमेथे, अजय सिडाम, अजय सुरपाम, विवेक वाकडे, महादेव कांबळे आदी उपस्थित होते.
आयोजन केवळ श्रद्धांजली नव्हे तर दहशतवादाविरुद्ध एक सामूहिक आवाज होता ज्याने गडचिरोलीकरांचे मन जिंकले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button