जाहिरात
क्रीडागडचिरोली

पुढाकार घेऊन क्रिकेट अकॅडमी सुरू करावी, संजय बडकस

Spread the love

लोकशाही न्यूज,गडचिरोली (दि.२४ एप्रिल)

विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यांच्या वतीने यंदा गडचिरोलीत व्हीसीए टी-२० क्रिकेट (लेदर बॉल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
गडचिरोली सारख्या उपेक्षित जिल्ह्यात कुणीतरी पुढाकाराने क्रिकेट अकॅडमी सुरू करावी जेणेकरून भविष्यामध्ये गडचिरोली सारख्या ठिकाणी अनेक गुणवंत खेडाळू तयार होऊन मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसतील असे मत क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय बडकस गडचिरोली येथे क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मत मांडले आहे.

गडचिरोली सारख्या शहरात जर क्रिकेट अकॅडमी सुरू झाल्यास होतकरू खेळाडूंना तिथे स्थान दिल्या जाईल व क्रिकेट या खेळाचे ज्ञान घेऊन त्यांना क्रिकेटमध्ये आपलं नाव चमकवण्यास वाव मिळेल असेही ते याप्रसंगी बोलले.पण हे सर्व करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन गडचिरोली येथे क्रिकेट अकॅडमी सुरू करणे आज गरजेचे झाले आहे.

आजपासून सुरु झालेली क्रिकेट स्पर्धा २४ एप्रिल पासून तर ३० एप्रिल या कालावधीत धानोरा रोड स्थित जिल्हा प्रेक्षगार मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेतूनच गुणवंत खेळाडूंचा विदर्भ क्रिकेट संघ निवडला जाणार आहे.

क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला कुणाल गनरकर ग्राउंड मॅनेजमेंट, परेश सर, मंगेश देशमुख, आशिष ब्राह्मणवाडे, सचिन मडावी, प्रशांत भुपाल, अजय बर्लावार, प्रणय न्यालेवार यांचे सह अनेक मान्यवर तथा क्रिकेट स्पर्धेतील सहभागी खेळाडू हजर होते.

उद्घघाटनीय सामना गडचिरोली विरुद्ध नागपुर यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात गडचिरोली संघाने नागपूर संघावर अवघ्या ४ धावांनी मात केली आहे. गडचिरोली संघाने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावा काढल्या. तर नागपूर संघाने १४८ धावा काढल्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button