मायक्रोस्कोप चोरी प्रकरणाची तात्काळ चौकशी करून, डॉ मोडक व भांडारपाल पवार यांचेवर निलंबनाची कारवाई करा,योगाजी कुडवे यांची मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२१ जुलै)
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील एक अतिशय दुर्गम व मागासलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्हयात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, गडचिरोली जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली या कार्यालयात पाच लाख रुपये किमतीचे मायक्रोस्कोप यंत्र चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. सन २०२०-२१ मध्ये देखील अशी चोरी झाली होती, परंतु याबाबत कुठेही तक्रार न करता प्रकरण दडवण्यात आल्याचे बोलले जात आहे,
यापूर्वी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकारी यांनी स्टोअर रुम मध्ये व आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुरक्षेची काळजी घ्यायला पाहिजे होते परंतु तसे करण्यात आले नाही परंतु आता परत लाखो रुपयाची मायक्रोस्कोप यंत्र चोरी गेले आहे.मायक्रोस्कोप यंत्र चोरी होणे हे पहिल्यांदाच घडत आहे त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे.
डॉ मोडक यांची नियुक्ती धानोरा तालुक्यातील गोडलवाही येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून आहे मात्र त्यांच्याकडे जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा मागील सहा वर्षापासून प्रभार आहे. तसेच भांडारपालाचा प्रभार असलेले श्री पवार हे केवळ आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे मागील पाच वर्षापासून भांडारपाल पदाचा प्रभार आहे परंतु त्या कार्यालयात लिपिक असताना अशोक पवार यांना भांडारपालचा प्रभार का वर देण्यात आला? हे पण संशयास्पद आहे.
या उघडकीस आलेल्या चोरीवरून असे दिसून येते की जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली या कार्यालयात असे अनेक यंत्र, सामान, खरेदी, हे कागदोपत्री रजिस्टर बुक मध्ये नोंद करून गहाळ केल्याचे नाकारता येत नाही? त्यामुळे डॉ मोडक यांना देण्यात आलेल्या प्रभारापासून ते आजता गायत ज्या खरेदी करण्यात आल्या त्या संपूर्ण खरेदी व्यवहाराची चौकशी करावी व खरेदी केलेली वस्तू ज्या ज्या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहेत, ती आज स्थितिमध्ये उपलब्ध आहे का? याची पण चौकशी करण्यात यावी,
हि चौकशी केल्यास हिवताप कार्यालय गडचिरोली येथील लाखो रुपयाचे अपरातफरी चे प्रकरण उघडकीस येऊ शकते, जिल्हा हिवताप कार्यालयाचा भोंगळ कारभार पाहता या चोरीत येतीलच अधिकारी – कर्मचारी असल्याचे नाकारता येत नाही ? तसेच मायक्रोस्कोप यंत्र खरेदी केली की कागदपत्रे खरेदी केले होते याबाबत सुद्धा संशय व्यक्त होते ?
कारण ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्याचे दिसून येत नाही ? त्यामुळे सदर चोरी प्रकरण बनावट असल्याचे नाकारता येत नाही व लाखो रुपयाची वस्तू चोरी गेल्याची दाखवून शासनाची फसवणूक केल्याची दिसून येत आहे ? त्यामुळे सदर प्रकरणात सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी डॉ मोडक व भंडारपाल पवार यांना या प्रकरणात आरोपी करण्यात यावे, यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
अशी मागणी योगाजी कुडवे यांनी दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, जिल्हाधिकारी यांना केलेली आहे.सदर प्रकरणाची चौकशी न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.अशी मागणी सुद्धा या निवेदनातून केली आहे.
