जाहिरात
दैनंदिन बातम्या

“आप” ची पुरग्रस्त राजोली गावाला भेट

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२२ जुलै)

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावरील पोटेगाव जवळील राजोली हे गाव पुराच्या पाण्यात पुर्णपणे बुडाल्यामुळे घरांची पडझड झाली आहे. गावातील प्रत्येक घरामध्ये सात ते आठ फुट पाणी साचल्यामुळे घरामधील अन्नधांन्याची नासधुस झाली. घरात चिखल पसरला असून खाण्यापिण्याची संपुर्ण भांडी कुंडी पुराच्या पाण्यात वाहून गेले. अथंरुण, पांघरुण भिजल्यामूळे तिनं दिवसांपासून रात्रभर जागरण करण्याची  ग्रामस्थांवर वेळ आली आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात पुरेशी व्यवस्था होत नसल्याने गावक-यांची गैरसोय होत आहे.आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा संघटन मंत्री संजीव जिवतोडे, शेतकरी आघाडी अध्यक्ष डॉ देवेंद्र मुनघाटे, ओ.बी.सी.सेल अध्यक्ष संतोष कोटकर यांनी सर्वप्रथम गावाला भेट दिली असता गावातील नागरिकांनी आपबिती सांगितली. प्रत्येक क्षतिग्रस्त घरांना भेट देऊन पाहणी केली असता खालील गावकरी हजर होते. भेटीत आनंदराव खोब्रागडे,प्रदीप बांबोडे,दिपक अलोने, गोवर्धन मडावी, विठ्ठलजी कुळमेथे, विठ्ठल गावडे, भाऊराव फुलझेले,हेमंत कन्नाके, भिमराव दुर्गे, कैलास कोराम, जनाबाई नामुर्ते,दिवाकर पुनकलवार,अजय पुनकलवार,प्रणय जनबंधु,कुन्दां बांबोडे, नामदेव जुमनाके, पुरुषोत्तम जुमनाके,धर्मा मडावी, रघुनाथ इस्टाम,भजन जुमणाके,पार्वताबाई जुमनाके, गोवर्धन मडावी,प्रमोद नामुर्ते,कुसमबाई सिडाम,योगेश सिडाम,पत्रु सिडाम, अरविंद कुमरे, रविंद्र कुमरे,विनोद नामुर्ते, अविनाश गेडाम,कोमल जुमनाके, यांनी नुकसानीची भरपाई मिळावी तसेच वाटप करण्यात येत असलेली कीट मुबलक प्रमाणात मिळावी,शेतीचे सर्वे करण्यात यावे,घराचे पडझडीचे सर्वे करण्यात यावे,गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

गावातील आदिवासी गोटूल मध्ये पाणी घुसल्याने आदिवासी समाज मंडळाचे सांऊड सिस्टिम सह संपूर्ण सामानाची नासधुस झाली आहे.पोलीस विभाग दादालोरो खिडकी उपक्रमा मार्फत सूरु केलेले वाचनालयात पाणी जाऊन पुस्तके भिजून खराब झाली आहेत.गावक-यांना अन्न,वत्र,निवारा शुद्ध पिण्याचे पाणी,विज,औषध उपचारा बरोबरच सर्वांगीण मदतीची निंतात गरज आहे.या गंभीर बाबींकडे शासन प्रशासनाने तातडीने लक्ष वेधून मदत देण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button