मणिपूर हिंसाचारातील दोषींवर तात्काळ चौकशी करून कठोर शिक्षा करा, ”आप” ची मागणी
लोकशाही न्युज गडचिरोली (दि,२१ जुलै)
भारत देशातील एक छोटासा राज्य मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे. जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्रातील भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत १४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.
मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरत आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात भीतीचे वातावरण तयार केले आहे, आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाहीं, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.
मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने केली आहे, केंद्रातील भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली ने केली आहे.
सदर निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती द्रोपदि मुर्मु यांना पाठविण्यात आले आहे याप्रसंगी उपस्थित जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, जिल्हा ओ.बी.सी सेल अध्यक्ष संतोष कोटकर, जिल्हा महिला संयोजक मिनाक्षी खरवडे, जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष डॉ देवेंद्र मुनघाटे, जिल्हा संघटन मंत्री संजीव जिवतोडे,महिला युवा संयोजक सोनाली नन्नावरे, जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष धनराज कुसराम इत्यादी उपस्थित होते.
