जाहिरात
आपला जिल्हा

२२ जुलै ला गडचिरोली जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२१ जुलै)

हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने शनिवार दि, २२ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी यासंबंधीचा आदेश आज जारी केला.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून, वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पलकोटा, पामुलगौतम व इद्रावती इत्यादी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे शिवाय अनेक मार्गही बंद आहेत अशातच हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये शनिवार दि, २२ जुलै रोजी बंद राहतील. मात्र, इतर सर्व कार्यालये, आस्थापना आणि दुकाने सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय मीणा यांनी जारी केले आहेत.

सदर आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता१८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील खालील मार्गे बंद ¶¶¶¶
१. सिडकोंडा -झिंगानूर (स्थानिक नाला)
२. कोत्तापल्ली र. – पोचमपल्ली (स्थानिक नाला)
३. आसरली – मुतापुर- सोमणूर (स्थानिक नाला)
४. मौशीखांब – अमीर्झा (स्थानिक नाला)
५. साखरा – चूरचूरा (स्थानिक नाला)
६. कूंभी – चांदाळा (स्थानिक नाला)
७. रानमूल – माडेमूल (स्थानिक नाला)
८. आलापल्ली- सिरोंचा रा.म.मा (कासरपल्ली नाला)
९. कान्होली -बोरी-गणपूर (कळमगाव नाला)
१०. चामोर्शी- कळमगांव (स्थानिक नाला)
११. चांभार्डा- अमिर्झा (पाल नाला)
१२. हरणघाट-चामोर्शी (दहेगाव नाला)
१३. तळोधी-आमगाव-एटापल्ली (स्थानिक नाला)
१४. कोनसरी-जामगीरी( स्थानिक नाला)
१५. आलापल्ली -भामरागड (बांडीया नदी, कुडकेली नाला, बिनागुंडा नाला, गुंडेनूर नाला व पेरमिली नाला)
१६. चामोर्शी-आष्टी (जामगिरी, येणापूर, सोनापूर नाला)
१७. कोपरअल्ली- मुलचेरा (दिना नदी)
१८. अहेरी- मोयाबिनपेठा-वटरा (वटरा नाला)
१९. चामोर्शी – हरणघाट (दहेगांव नाला)
२०. कोनसरी जामगीरी ( रेशीमपूर नाला, मारोडा नाला)
२१. सावेला – कोसमघाट- रायपूर (स्थानिक नाला)
२२. राजोली -मारदा (स्थानिक नाला)
२३. पोटेगाव ते राजोली (स्थानिक नाला)

खालील मार्गे बंद असल्याने जनतेने काळजी घेऊनच घरा बाहेर पडावे,कुठलीही अनुचित घटना होऊ नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे.

 

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button