हुरैन पठाण हिचा पहिला रोजा

लोकशाही न्यूज,गडचिरोली (दि,१२ एप्रिल)
मुस्लिम समाजातील सर्वात पवित्र रमजान हा महिना असून गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्ड येथील हुरैन पठाण वय ६ वर्ष या मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. सध्या या वर्षीचा उन्हाळा हा अत्यंत उष्णतेचा सर्वात जास्त तापमान असलेला महिन्यात हा रमजानचा महिना आला आणि मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांना देखील खूप त्रास होतो त्यात या ६ वर्षांच्या चिमुकली ने पहिला रोजा ठेवून आपल्या इस्लाम धर्मातील परंपरा नुसार आयुष्याची सुरुवात केली व आपल्या अल्हा समोर पुण्याई चांगल्या प्रकारे व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली .
अशा उष्णतेच्या एवढ्या अवस्थेमध्ये ६ वर्षाच्या वयात हुरैन या चिमुकलीने आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल नातेवाईक कडून अभिनंदन होत आहे.
आजोबा बशीर पठाण, आजी हमीदा पठाण, वडिल इम्रान पठाण, आई सायमा पठाण , मोठे वडील अमजद पठाण,मोठी आई रुबिना पठाण, शुमहिल,सुफियां, रेहान,उजैब, लहान बहीण शीब्रा व पठाण परिवारातील इतर सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
