जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणुक शिवसेनेच्या हक्काची, डॉ.रामकृष्ण मडावी माजी आमदार यांची पत्रकार परिषदेत माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३ जुलै)

देशात आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका लागणार आहेत,त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून गडचिरोली -चिमूर क्षेत्राची सीट शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाला द्यावी अशी मागणी डॉ .रामकृष्ण मडावी माजी आमदार यांनी आज स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

(पत्रकार परिषदेत माहिती देताना रामकृष्ण मडावी माजी आमदार(ठाकरे गट)

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रावर शिवसेनेने दावा केल्याने महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. आज आरमोरी विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी पत्रकार परिषद घेऊन या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात मागील दोन टर्म मध्ये भाजपचे खासदार निवडून आले आहेत. या मागील तीन निवडणुकीत एक वेळा कॉंग्रेस चे जेष्ठ नेते मारोतराव कोवासे हे निवडून आले होते. त्या नंतर कॉंग्रेसने उमेदवार नवा दिल्याने त्याचा पराभव झाला होता. त्या वेळ पासून इथे भाजपचे खासदार अशोक नेते सातत्याने दोनदा निवडून आले आहेत .

परिषदेला डॉ .रामकृष्ण मडावी माजी आमदार यांच्या सह कल्पना तिजारे  सदस्य, बुधाजी किरमे माजी सरपंच, नंदू कुमरे विधानसभा संघटक, गजानन नैताम, तालुका प्रमुख आरमोरी, बालाजी बोरकर, सुनील बांगरे, नरेश हिरापुरे, रामदास दहीकर, चंद्रशेखर उईके धानोरा तालुकाप्रमुख इत्यादी कार्यकर्ते पत्रकार परिषदेला हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button