मानवाधिकार लोकहिताची चळवळ व्हावी, डॉ. मिलिंद दहिवले

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२५ नोव्हेंबर)
संपादक:संदिप कांबळे
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल वने व विविधतेने नटलेला जिल्हा आहे. येथे आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पिण्याचे पाणी, रोजगाराच्या समस्या आहेत. बऱ्याच वेळेस आपल्या मानवाधिकाराचे उल्लंघन होत असते. त्यांना कुठलीही मदत कोणत्याही स्वरूपात त्यांना मिळत नाही त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित असतात. मानवाधिकार असा हा अधिकार आहे जन जन्म घेतल्याबरोबर लागू होतो कोणत्याही व्यक्तीचे जगण्याचे स्वातंत्र्य, समानता बंधुत्व व प्रतिष्ठा चे अधिकार म्हणजेच मानवाधिकार होय, मानवाधिकार ही लोकहिताची चळवळ व्हावी असे मत आज स्थानिक विश्रामगृह येथे पार पडलेल्या परिषदेत डॉ मिलिंद दहिवले राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली यांनी मांडले आहे.ते आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात लवकरच मानवाधिकार संघटनेचे कार्यालय स्थापन होणार अशी सुद्धा माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
बरेच रुग्ण अतिशय दुर्गम भागातून तालुका व जिल्हा स्तरावर उपचार करण्यासाठी येत असतात. त्यांना तिथ पर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग व संसाधने सोयीस्कर उपलब्ध होत नाही अशा वेळेस रुग्णाचे, गरोदर माताचे व ज्येष्ठ नागरिकांचे नाहक बळी जात असतात. सध्या शासनाच्या नवीन निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यामुळे बऱ्याच मुलांचे भवितव्य अंधारात येणारे आहे.संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये व त्यांच्या मानवाधिकार्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्या मानवाधिकार्याच्या संरक्षणाच्या संदर्भात शासन स्तरावरती विचार होणे व अतिशय आवश्यक आहे.
भामरागड,सिरोंचा,एठापल्ली,अहेरी,कोरची सारख्या तालुक्यात पावसाळ्याच्या काळात पूर्णपणे संपर्क तुटलेला असतो. शेती घर जनावरे यांच्या मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते हे सर्व कुठेतरी थांबायला पाहिजे शासनाच्या विकासात्मक कामाच्या माध्यमातून मानवी अधिकाराचे संरक्षण केले जाऊ शकते त्याकरिता शासनाने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती करणे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे तसेच मानवाच्या भारतीय संविधान दिलेल्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे या करिता संघटनेच्या वतीने गाव, तालुका व जिल्हा स्तरावती संघटना प्रयत्नशील राहील.

(संघटनेचे काम करण्यासाठी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष म्हणून विपुल खोब्रागडे यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली, नियुक्तीपत्र देताना मिलिंद दहिवले)
पार पडलेल्या पत्रकार परिषदेला अखिल पवार, आकाश ढाली, सूरज रायपुरे, अभिषेक गुरनुले व इतर कार्यकर्ते हजर होते.
