जाहिरात
गडचिरोली पोलीस

७ लक्ष १९ हजार ,६९० रुपये किमतीच्या मुद्देमालासह,साडेसहा किलो गांजा व ३ आरोपी जेरबंद

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (२९ मे)

२७ मे रोजी गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने रात्रोचे दरम्यान मौजा इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान,
(१) आशिष धनराज कुळमेथे, वय २८ वर्षे, रा. संजयनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर,
(२) धनराज मधुकर मेश्राम, वय ३३ वर्षे, रा. नेहरुनगर, चंद्रपुर ता.जि.चंद्रपुर,
(३) कु. ज्योती श्रीकृष्ण परचाके, वय २२ वर्षे, रा. शास्त्रीनगर, चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच.३४ बी.आर.४०८६ ची पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनाचे डिक्कीत एकुण ९९,६९० रुपये किंमतीचा ६.६४६ कि.ग्रॅ. गांजा, ६,००,००० रुपये. किमतीचे चारचाकी वाहन तसेच २०,०००रुपये किंमतीचे मोबाईल असा एकुण ७,१९,६९० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा अंमली पदार्थ (गांजा), मोबाईल तसेच गांजा वाहतुकीकरीता वापरलेले स्विफ्ट चारचाकी वाहन जप्त करुन नमुद आरोपीतांविरुध्द पोस्टे गडचिरोली येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन गडचिरोली येथील मपोउपनि संघमित्रा बांबोळे करीत असुन आरोपीतांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने सदर आरोपीतांचा दि, ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला असुन सदर गुन्ह्राचा तपास सुरु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल तसेच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात रुपाली पाटील,नरेश सहारे,हेमंत गेडाम, सतिश कत्तीवार,राकेश सोनटक्के,उमेश जगदाळे, सचिन घुबडे, माणिक दुधबळे,लक्ष्मी बिश्वास,सविता उसेंडी,माणिक निसार,मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button