खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात भाजपाचे महाजनसंपर्क अभियान ३० मे ते ३० जून पर्यंत
लोकशाही न्युज, ( गडचिरोली दि.२९ मे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या नवनिर्माणाची ९ वर्ष सफलतेने पूर्ण झाल्याबद्दल भाजपाचे महा जनसंपर्क अभियान व लोकसभा क्षेत्रातील झालेल्या कामाचा लेखाजोखा सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत (गडचिरोली – चिमूर) क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी मांडला.
या नववर्षाच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी प्रथमतः: पंतप्रधान झाले त्यावेळी खुर्चीवर बसण्याच्या अगोदर धरती मातेला नतमस्तक होऊन नमन केल की या देशातील जनतेच्या कल्याणासाठी व सर्व सामान्य नागरिकांच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याचा व सर्वांना न्याय देण्याचं संकल्प केला. या देशात स्वच्छ प्रशासन सुशासन असले पाहिजे या ९ वर्षाच्या कार्यकाळामध्ये डिजिटल इंडिया चा नारा दिला, ऑनलाईन सिस्टीम चालू केली या ऑनलाईन सिस्टीमने प्रत्येक योजनेचा पैसा हा ऑनलाईन द्वारे प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते यामुळे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये अशी पद्धत अमलांत आणली.
कोरोणाच्या काळामध्ये रेमडिसीयन,औषधी,लस अत्यावश्यक सोयी सुविधा पुरविल्या.कोरोणा अशा भयानक महामारीतुन देशाचे रक्षण केल. कौतुक व अभिनंदन करावा तेवढे कमी आहे.एवढेच नाही तर ६० वर्षांमध्ये व ९ वर्षा केलेल्या कार्याचं फरक या पत्रकार परिषदेत मांडला.
खासदार अशोक नेते यांनी यानिमित्ताने भाजपकडून ३० मे ३० जून दरम्यान महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात केंद्रीय मंत्री कोनसरीच्या प्रकल्पात उद्घाटनाला येणार असल्याची माहिती सुद्धा दिली पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात ३० ते ३० जून दरम्यान विविध संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. यात लाभार्थी, व्यापारी, बुध्दिजिवी वर्ग, आदिवासी, ओबीसी , इत्यादी संमेलनाचे आयोजन केले जाईल अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली.
पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे मदार डॉ. देवराव होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे,जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,प्रदेश सरचिटणीस एस.टि.मोर्चा चे प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्या रेखा डोळस,भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, बंगाली समाजाचे जेष्ठ नेते दिपक हलदार,युवा अनिल तिडके, आशिष कोडाप यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.
