ब्रेकिंग न्यूज, चीचडोह बॅरेज मध्ये बुडून ४ विद्यार्थ्यांचा करूण अंत

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,१४ मे)
चामोर्शी शहरापासून मार्कंडा रोडवर असलेल्या चीचडोह बॅरेज मध्ये आज दुपारच्या सुमारास पोहायला गेलेल्या ४ शाळकरी विद्यार्थ्यांचा करून अंत झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
सदर घटना आज रविवार दुपारी चारच्या सुमारास घडली. मोनू त्रिलोक शर्मा वय २६, गडचिरोली, प्रफुल विठ्ठल येनुरे वय २०, शुभम रूपचंद लांजेवार २४, महेश मधुकर घोंगडे २० हे राहणार चामोर्शी अशी मृत्तक शाळकरी मुलांची नावे आहेत. मृतक चीचडोह बॅरेजवर फिरायला गेले असताना त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही व चारही मुलांनी पोहायला खोल पाण्यात गेले असता त्यांना पाण्याबाहेर येता आले नाही व त्यांचा त्यातच करून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व बचाव पथक चीचडोह बॅरेज ला रवाना होऊन एक तास शोध मोहीम राबवली असता चारही मृतकाचे शव पाण्याबाहेर काढण्यात त्या पथकाला यश आले. पुढील तपास चामोर्शीचे ठाणेदार राजेश खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .
