राजकीय
महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू गडचिरोली ला येणार ? खासदार अशोक नेते यांनी घेतली सदीच्या भेट

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १० मे २०२३)
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शिलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मू गडचिरोली येण्याची शक्यता आहे.
महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी भेट घेत गडचिरोली येण्या संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे उपस्थित होते.
जाहिरात
