जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

राष्ट्रीय महामार्गाची कामे तातडीने पुर्ण करा, खासदार किरसान यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१८ सप्टेंबर)

गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत असल्याने, अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. आरमोरी – गडचिरोली, आष्टी – आलापल्ली – सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्याचे व रस्त्याचे काम पुर्ण होत पर्यंत रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावे अश्या सुचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

शासकीय विश्राम भवन कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची राष्ट्रीय महामार्ग (वेस्ट झोन ) मुख्य अभियंता मनोज कुमार, मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी प्रशांत फेगडे, मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग संतोष शेलार, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर न. व. बोरकर, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग गडचिरोली एन. एस. बोबडे यांच्या सॊबत बैठक पार पडली यावेळी सोबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या पुलांची उंची वाढविण्याचे व नवीन पुल तयार करत असतांना शक्यतो जुना पुल कायम ठेवून बाजूला नवीन पुल उभारण्याच्या देखील सूचना खासदार डॉ.किरसान यांनी केल्या जेणे करून काम पूर्ण होत पर्यंत प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही, याव्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्गाच्या कामास पर्यावरणीय किंवा वनविभागाच्या परवानगी संदर्भात किंवा इतर कुठल्याही अडचणी येत असल्यास त्या दूर करण्याकरिता क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणुन पुर्ण सहकार्य करणार असल्याचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी बैठकितत सांगितले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button