निधन वार्ताव्हाहाड
सोनापूर येथील माजी उपसरपंच श्री अशोकजी रामटेके यांचे निधन
लोकशाही न्यूज
सुदर्शन गोवर्धन
व्याहाड सर्कल प्रतिनिधी (दि,२७ ऑक्टोंबर)
सावली तालुक्यातील सोनापूर ग्रा. पं. चे माजी उपसरपंच श्री अशोकजी बुधाजी रामटेके यांचे दि.25/10/2022 ला रात्रौ च्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५वर्षाचे होते.
त्यांच्या अचानक निधनाने सोनापुरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते सतत हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. त्यांचा सोणापुर येथे “टेलर्स ‘ “म्हणून लौकिक होता
हि बाब आज दि.२६/१०/२०२२ सकाळीं ६च्या सुमारास चाय पिण्यासाठी उठवायला गेल्यावर निदर्शनास आली.
त्यांच्यावर वैनगंगा नदीघाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडअसा बराच मोठा आप्त परिवार आहे.
जाहिरात
