जाहिरात
गडचिरोलीदिन-विशेष

अनुरथ निलेकार रामनगर यांच्या घरी गोमाता पूजन, दिवाळी सणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन

Spread the love

गडचिरोली ( दि, २५ ऑक्टोंबर )
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बलिप्रतिपदेच्या दिवशी गायीचे पूजन करून गोमाता संगोपनाची परंपरा भारतीय संस्कृतीत चालत आली आहे, गडचिरोली येथे  अनुरथ निलेकार रामनगर वार्ड क्रमांक ९ यांच्या घरी गोमाता पूजन करण्यात आले.
गोमातेच्या संगोपनाची परंपरा ही भारतीय संस्कृतीचे उत्तम उदाहरण कृषी प्रधान देशात गाईला अनन्य साधारण महत्त्व आहे संगोपन काळाची गरज आहे.
गाईच्या दुधापासून दही, तूप, शेतीसाठी शेणखत गोमुत्रापासून किटनाशक मिळत असल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा ग्रामगीते गोवंश सुधार हा अध्याय लिहून गाईच्या संगोपनाची गरज सांगितली आहे. गोमाता ही कामधेनु आहे त्यामुळे आजही दिवाळी सणाला हिंदू सणांमध्ये गाईचे पूजन करण्यात विशेष महत्त्व आहे.

(गोमातेच्या पूजन प्रसंगी मान्यवरगण)

या शुभप्रसंगी अनुरथ निलेकार, डॉ.उईके, कमलकिशोर खोबरागडे, कोमेश कत्रोजवार, ज्ञानेश्वर निलेकार, महेश निलेकार, गोपाल आरेकर, निरंशाह मसराम, देवराव मलोडे, रमेश नंदापुरे, घनश्याम मस्के, दयाराम निलेकार,अलाम साहेब, राजू आखाडे, टीकाराम शिवनकर,रवी बांगरे, शिलाबाई शीवनकर, कुंदा बावणे, गीता महाजन, शालुबाई भुसारी, प्रभा देशमुख, पार्वताबाई भुसारी, धुर्पदा मलोडे, यामीना निलेकार, देवयानी निलेकार, निकिता निलेकार, माधुरी आरेकर, राधा आरेकर, अक्षता निलेकार, काशी निलेकार, श्रवण धात्रक, पूर्वी कत्रोजवार, प्रियांशू कत्रोजवार, अंशू कत्रोजवार, शर्वरी बांगरे, शुभ्रा भांगरे व बालगोपाल मंडळी गोमातेच्या पूजनाला आवर्जून हजर होते.

(गोमातेच्या पूजन प्रसंगी श्रीकृष्णाच्या भूमिकेत गोपाल)

पूजनानंतर लगेच प्रमुख पाहुणे व वार्डवासी यांना दिवाळीचे फराळ व चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button