वीज कोसळून कुटूंबातील ४ ठार देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील आजची घटना
लोकशाही न्युज वडसा (दि,२४ एप्रिल)
देसाईगंज- कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी (तुळशी फाटा) जवळ वीज पडून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची घटना आज २४ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ५ वाजता च्या सुमारास घडली.भारत लक्ष्मण राजगडे (वय ३२वर्षे )संगीतकार रा.आमगांव व त्यांची पत्नी अंकिता भारत राजगडे (वय ३० वर्षे) दोघेही पती-पत्नी आपल्या दोन्ही लहान मुलींसह देवांशी भारत राजगडे (वय ४ वर्ष),मनस्वी भारत राजगडे (वय २ वर्ष) मालेवाडा /गरगळा येथुन लग्न लावून येत असतांना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात होऊन वीज कडाडने सुरू झाले. व ही घटना घडली .
वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दुग्ध डेअरी जवळील एका झाडाच्या खाली आसरा घेतला असता अचानक वीज अंगावर कोसडल्याने राजगडे कुटूंबातील ४ ही जण जागीच मृत्युमुखी पडले. चारही जणांचा जागेवर अंत झाल्याने आमगाव गावात शोककळा पसरली आहे .
या बाबत दसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून चार ही जणांचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे पाठविले पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.
झाडीपट्टी रंगभूमीत शोककळा ¶¶¶¶
मृतक भारत राजगडे हे रंगभूमीवरील गायक, तबलावादक होते. नाटकांमध्ये तसेच संगीतमय कार्यक्रमांमध्ये गाण्यांना संगीत देण्याचे काम केले आहे. सद्यस्थितीत ते लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमात मैफिलीचे कार्यक्रम घेऊन कुटुंबाचा गाडा चालवित होते. ते आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून काही वर्षापुर्वीच वडिलाचे निधन झाल्याने म्हाता-या आईसह कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत होते. त्यांच्या मृत्यूमुळे म्हाता-या आईचा आधार हिरावला गेल्याने राजगडे परिवारातील सदस्य गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.
