योगाजी कुडवे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या गडचिरोली जिल्हाअध्यक्ष पदी निवड

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२१ एप्रिल)
गडचिरोली मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या योगाजी कुडवे (उपसरपंच) ग्रा. पं. आंबेशिवणी, ता- जिल्हा गडचिरोली यांची अखिल भारतीय सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेच्या ध्येयधोरणानुसार कार्यरत राहून सहकार्य करावे असे कळविले आहे, कुडवे यांची जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती मा. जयंतदादा पाटील, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य, यांनी केली आहे. कुडवे यांनी अडव्होकेड देवा पाचभाई विदर्भ अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद व श्री. राजेंद्र कराळे, राज्य सल्लागार अखिल भारतीय सरपंच परिषद यांना निवडीचे श्रेय दिले आहे.
सरपंच ग्रा पं. आंबेशिवणी श्रीमती सरिता टेंभुणे, विलास गावडे सरपंच ग्रा. पं बुर्गी, विलास झंजाळ, धनंजय डोईजड, नीलकंठ संदोकर, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम, मुनेश रडके, विलास भानारकर, आकाश मट्टामी यांनी अभिनंदन कुडवे यांच्या निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.
