जाहिरात
आपला जिल्हा

व्हॉईस ऑफ मीडिया च्या कौटुंबिक संमेलनात ३४ पत्रकारांना १० लाखाचा विमा प्रदान

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२० एप्रिल)

जिल्ह्यात प्रथमच झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया च्या स्नेह संमेलन कार्यक्रमात पत्रकारांचा प्रत्येकी दहा लाखाचा विमा कवच काढण्यात आला.
या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले,विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांच्या सह जेष्ठ पत्रकार रोहिदास राऊत,कांतिभाई,लोकमत चे जिल्हा प्रतिनिधी संजय तीपाले,लोकसत्ता प्रतिनिधी सुमीत पाकलवार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार सूचक,जिल्हा सचिव कैलाश शर्मा उपस्थित होते.

(व्हॉइस ऑफ मीडियाचे कौटुंबिक संमेलन संपन्न)

महाराष्ट्रात सर्वाधिक पत्रकाराचा विमा कवच काढण्याचा श्रेय व्हॉईस ऑफ मीडिया ला असून,प्रत्येक दैनिक,साप्ताहिक इलेक्ट्रॉनिक,आणि डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसह वर्तमान पत्र विकणारे वितरक सुध्दा या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

व्हॉईस ऑफ मीडिया च्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुकुंद जोशी,नरेंद्र महेश्वरी,रेखा वंजारी,जयंत निमगडे,गामा पत्रकार संघटनेचे संयोजक राजू सहारे,प्रल्हाद म्हशाखेत्री,कृष्णा वाघाडे
यांनी चिकाटीचे प्रयत्न केले होते.
या आयोजनात संदीप कांबळे,अनिल गुरणुले,शरीफ कुरेशी,गणेश शिंगाडे मुकेश गेडाम,अनुप मेश्राम, यांच्या सह जिल्ह्यातील शेकडो पत्रकार सहभागी झाले होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button