बी फॅशन प्लाजा च्या दुकान उद्घाटन प्रसंगी वाहतुक झाली जाम
लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,२२ मार्च)
गडचिरोली शहरातील मुल चंद्रपूर महामार्गावरील नव्यानेच उभारलेल्या भव्य वस्तू मध्ये बी फॅशन प्लाझा या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी गडचिरोली शहरातील ट्राफिकचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
( दुकानापुढे वाहतुकीचा फज्जा)
दुकानाच्या समोर कुठलीही पार्किंगची व्यवस्था नसताना दुकानात येणारे जाणारे लोक रोडवरच वाहन पार्किंग करून दुकानांमध्ये खरेदीसाठी जात आहेत. वाहनाच्या दुतर्फा गर्दीने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असंख्य वाहनाच्या गर्दीने ट्राफिकचा फज्जा उडालेला आहे वाहतूक निरीक्षक पुनम गोरे यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांनी आपल्या ताफ्यातील तीन ट्राफिक हवालदार वेळीच पाठवून ट्राफिक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

(महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे असलेले ट्राफिक पोलीस )
सदर दुकानात दुचाकी चार चाकी वाहनाची कुठलीही पार्किंगची व्यवस्था नसताना सदर दुकानाला नगरपरिषद प्रशासनाने दुकान उद्घाटनाची परवानगी दिलीच कशी हा चर्चेचा विषय आहे.
संबंधित बाबीची दखल घेऊन भविष्यात महामार्गावर कुठलाही अपघात होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेने उचित कारवाई करावी अशी मागणी गडचिरोली
वासीयांनी केलेली आहे.
